नाथसागर जलाशय ५० टक्क्यांवर

Foto
पैठण, (प्रतिनिधी) नाथसागरच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर असून पुराचे पाणी नाथसागर (जायकवाडी) जलाशयात दाखल होत आहे. त्यामुळे नाथसागर जलाशयातील पाणीसाठ्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ५०.१५ टक्के झाला.
नाशिक परिसरातील गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर तसेच गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. नाथसागर जलाशयातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. रविवारी दुपारी बारा
वाजता पाण्याची पातळी पुढीलप्रम  ाणे होती. १५२२ फुटव ४६३.९०६ मीटर क्षमता असलेल्या जलाशयाची पाणी पातळी १५११.४७ फुट, ४६०.४९६ मीटर, जिवंत साठा १०८८.७२४ दलघमी म्हणजे ३८.४४ टीएमसी एकूण पाणी साठा १८२६.८३, ६४.५१ टीएमसी.
आवक ५९२५३ क्यूसेक टक्केवारी ५०.१५ टक्के झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवक मंदावली आहे. सध्याची आवक पाहता धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions